पुणे महानगर पालिकेचा धोरणात्मक चेहरा: डॉ.कुणाल मंडवाले
रोहित झापर्डे (आय टी इंजिनियर) ता. तेल्हारा, जि.अकोला
पुणे महानगर पालिकेचा धोरणात्मक चेहरा: डॉ.कुणाल मंडवाले
बुलढाणा जिल्ह्यात १२ सप्टेंबर १९८३ मध्ये जन्मलेलं व्यक्तिमत्व. घरी शेती आणि व्यापार या दोघांचं कॉम्बिनेशन व त्या परिस्थितीत कष्ट करून स्वतःचे ध्येय गाठणार व्यक्तिमत्व. शालेय शिक्षण हे नूतन मराठी शाळेमध्ये सन 1999 पूर्ण झाले. त्यानंतर बी कॉम हे 2004 या साली पुणे येथील नामांकित कॉलेज मधून पूर्ण झाले. 2005 साली एल एल बी चा अभ्यास सुरू केला आणि कायदेशास्त्रच्या युगात शिरले. 2009 साली कंपनी सेक्रेटरी (CS) चा नवीन रोल त्याच्या जीवनात सुरू झाला असेच जीवनातील डावपेच राखत सद्या पुणे महानगर पालिकेत कार्यरत आहेत.
सध्याची कार्यपद्धती ?
सन 2011 साली पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी मिळाली नंतर 2012 साली (CFO)-Dy (CFO)वित्त अधिकारी तथा प्रथम अपिल अधिकारी या पदा ची जबाबदारी सोपविण्यात आली. जीवनात न कधी बघितल्या गेलेल्या आकड्यांना बघून जवाबदारी स्वीकारली त्यांचे 11,000 कोटींचे बजेट आणि 50,000 (हजार )कोटींची बॅलन्स शीट हे पहिल्यांदाच अनुभवले. नोकरी करताना त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले आणि प्रत्येक परिस्थिती ला तोंड देत ते पुढे आले. तसेच नव्या तंत्रज्ञाना ला तोंड देत आणि काही आव्हाने स्वीकारत पुढे जात आहेत. त्यांची मुख्य कार्य पद्धती ही सरळ आणि सत्य मार्गानें होती, मुख्य जबाबदारी हि आर्थिक नियोजन करणे, आर्थिक जोखमीची व्यवस्था करणे, आर्थिक विश्लेषण करणे, आर्थिक अहवाल सादर करणे, इत्यादी आहेत. त्याचे हीच कार्यपद्धती त्यांच्या खात्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
त्यांच्यामध्ये वेगळे काय आहे ?
कोणत्याही गोष्टीवर 360 अँगल ने विचार करून सत्य समजून घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे, कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता, खात्या मध्ये येणाऱ्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल इश्यू सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे. पालिका सेवकांकडून काही चुकल्यास त्यांना माफ करून योग्य आणि शांतपणे समजून सांगण्याची शैली, प्रत्येकाना होईल तेवढी मदत करणे, आलेल्या विकत परिस्थिती तून बाहेर काढणे व त्या संदर्भात दिलेला सल्ला. सर्वांना मदत करत असल्यामुळे सर्व कर्मचारी त्यांना मानतात. त्यांचेकडून शिकणे योग्य आहे की म्हणजे मल्टीटास्किग, एकच वेळेच एक पेक्षा जास्त कार्य/काम करणे त्याच्या या कार्य पद्धती मुळे, त्यांना डॉक्टरेट, सी एस , विविध सर्टिफिकेट, सोसियल ऍक्टव्हिटी या सारखे विविध गुण अंगी घेता आलेत. मनमिळाऊ स्वभाव, स्वतःला उच्च आणि समोरच्याला तुच्छ न समजण्याची भावना, इतराना महत्व देण्याचे काम, या सर्व गोष्टीमुळे ते सर्वांच्या पसंतीचे आहे.
त्यांच्यासोबत भेटण्याच्या अनुभव ?
सर्वप्रथम 2022 मध्ये त्यांच्यासोबत एका कामा निमित्ताने आमचे मित्र कपिल गोमसे यांचा मुळे भेटण्याचा योग जुळून आला. त्यांच्याकडून मला नेहमी योग्य मार्गदर्शन मिळाले. माझ्या आयुष्यातली लेख लिहिण्याची सुरुवात ही त्यांनीच दिलेल्या सल्ल्यामधून संधीचे रूपांतर आहे. नवीन काहीतरी शिकण्याची, मिळवण्याची, दिशा ही त्यांच्याकडूनच मिळाली. माझ्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेत, पण त्यामधले काही यशस्वी ठरले तर काही अयशस्वी. परंतु दुसऱ्याची मदत करण्यात ते सदा तत्पर आहेत, त्यांच्या सोबत केलेल्या प्रवासात खूप काही अनुभव मिळाले. माझ्या जीवनात महत्त्वाची व्यक्ती आहेत जे मी असे समजतो की काही माझे भाग्य असल्यामुळे त्यांची आणि माझी मैत्री जुळली असावी.
पालिकेला होणारा त्यांचा फायदा ?
१)भारत सरकारच्या पोर्टलवर शहरी आर्थिक माहिती अपलोड करून, प्रत्येक वर्षी डेटा अपडेट करणे,केंद्र सरकारला अहवाल सादर करून पुण्याच्या आर्थिक प्रगतीचे आकडे देणे.
२)भोपाळमधील स्मार्ट सिटी सम्मेलन, देशातील १०० शहरांचे प्रतिनिधी. पुण्याच्या वतीने प्रेझेंटेझेंटेशन, मुनिसिपल बॉन्डचा अनुभव शेअर करण्याची संधी मंचावर उभे राहून बोलताना मनात अभिमानाची भावना. आमचं शहर, आमचं काम, देशासमोर मांडण्याचा गर्व ते पण पालिकेसाठी.
३)जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी, त्यांच्या कॉन्फरन्समध्ये सहभाग. दिल्ली, वाराणसी, आंतरराष्ट्रीय अनुभवाचा लाभ. जापानी तंत्रज्ञानाचे कौतुक, त्यांच्या कार्यपद्धतीचं अवलोकन. फायनान्स टीमचा लीडर म्हणून पीआययूमध्ये काम करणाच्या अनुभव.
४)पब्लिक फायनांशियल मॅनेजमेंट सिस्टम, सिंगल नोडल एजन्सी म्हणून काम. केंद्र सरकारच्या योजनांचे पैसे, पारदर्शक पद्धतीने वितरण. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा माहिती, डिजिटल प्लॅटफॉर्मवर नियंत्रण. या तंत्रज्ञानामुळे पालिकेच्या भ्रष्टाचारावर अंकुश बसला आहे.
५)एमएमसीएच्या कलम ९२ चा अर्थ लावून बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअर्स. पारंपारिक एफडी च्या जागी इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा प्रयोग. जोखीम व्यवस्थापन करताना नवीन संधींचा शोध. या धाडसी निर्णयामुळे कॉर्पोरेशनला चांगला फायदा
६)सीएफओ कॉन्फेक्समध्ये “यंग अँड इन्स्पायरिंग फायनान्स लीडर”!आठव्या कॉन्फेक्समध्ये हा सन्मान,वयाच्या ३८ व्या वर्षी मिळालेला पुरस्कार.फायनान्स क्षेत्रातील तरुण नेतृत्व,नावीन्यपूर्ण कामांची ओळख ठरलेली पालिका.
७)९व्या टॅक्स स्ट्रॅटेजी समिटमध्ये “एक्सलेंस इन कंप्लायन्स” पुरस्कार! नियम पालनातील उत्कृष्टता, इनोव्हेटिव्ह अप्रोचची ओळख. जटिल नियमांचे सोपे अर्थ लावणे, व्यावहारिक समस्यांचे निराकरण. या कामामुळे कॉर्पोरेशनमध्ये कंप्लायन्स कल्चर विकसित झाला आहे.
८)२०२५ मध्ये निवडले गेले टॉप टेन इन्व्हेस्टमेंट प्रोफेशनलमध्ये, गुंतवनूक व्यवस्थापनातील कौशल्य, इनोव्हेटिव्ह फायनांशियल सोल्युशन्स.
९) त्यांच्या योगदानाची दाखल भारत निवडणूक आयोगाने २०१४ मध्ये घेतली आहे.
१०) माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका आत्मसात केली आणि २०१७ मध्ये पहिले महानगरपालिका रोखे उभारल्याबद्दल पीएमसीचे कौतुक केले.या सर्व योगदानाचा फायदा पालिकेला झाला. त्यांच्या जन्मदिनी लिहिलेला लेख ‘गिफ्ट’ म्हणून त्यांना समर्पित.
रोहित झापर्डे
(आय टी इंजिनियर)
ता. तेल्हारा, जि.अकोला
========



