0
4
8
2
8
6
अनमोल तुझी साथ
तुझी साथ अनमोल होती
म्हणून तर मी कठीण
परिस्थितीत ताट उभी होती
तुझी साथ तोलामोलाची होती
शब्द दिलीस वचनही पाळलीस
लेकीसाठी तू परीवार टाळलीस
तुझ्या प्रेमाला सीमा नव्हती
माझ्या प्रयत्नांची परीक्षा होती
सर्वांनी सोबतीला नाही म्हटले
तेव्हा तू मला हात दिलीस
आजी ,तू मोलाची साथ दिली
नात्याला या अनमोल केलीस
जीवात जीव गुंतला होता
एकमेकांना लळा लागला होता
तूच आमचा आधार बनलीस
कोरोनात ही निर्भिड केलीस.
आता तुझा आधार बनायची
वेळ आली होती पण तू गेलीस
जिव्हाळ्याचा डोंगर उभारून
सर्वांनाच आता पोरकं केलीस.
बेबी/अनु विठ्ठलराव बोईनवाड
जिल्हा नांदेड
0
4
8
2
8
6



