0
6
3
0
9
6
मोबाईलचा नाद
मोबाईलचा नाद लागला,
डोकं गेलं फिरून
माणुसकीची वाट लागली,
नाती गेली तुटून।।
एक दिवस तरी राहा रे,
मोबाईलला बाजूला ठेऊन
तेव्हाच कळंल जरा,
जगणं काय असतं हसून।।
किती नंबर आठवतं,
सांग बघू मनाला
स्क्रीनमंदी रेंगाळता,
विसरलास माणसाला।।
बायको-पोरं घरात,
पण लक्ष मोबाईलात
कसलं रे हे प्रेम तुझं,
अडलं त्या काचेत।।
दिवस जातात स्क्रोल
करत, रात्र जाते जागून
शेवटी उरते पोकळी,
मन आतून रितं होऊन।।
डॉ. बालाजी राजूरकर
ता. हिंगणघाट जि. वर्धा
=======
0
6
3
0
9
6



