Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणनागपूरमहाराष्ट्रराजकियविदर्भ

रायगड पोलीस पाटील नागपूर येथे विधान भवनावर दाखल

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 0

रायगड पोलीस पाटील नागपूर येथे विधान भवनावर दाखल

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

रायगड/ नागपूर (दि ९ डिसेंबर) : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. १० डिसेबर 2025 रोजी पोलीस पाटील न्याय व हक्कासाठी नागपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. रायगड जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील पदाधिकारी व पोलीस पाटील पोलीस सहभागी होत आहेत. सदर मोर्चा यशवंत स्टेडियम येथून निघून झिरो माईल चौक येथे त्याचे सभेत रूपांतर होणार आहे. शासनाकडून आपल्या प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघ वेळोवेळी प्रलंबित मागण्या संदर्भात पाठपुरावा करत आलेला आहे काही दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील सचिवांच्या उपस्थित बाळासाहेब शिंदे पाटील यांनी बैठक आयोजित केली आणि वयाचे ६० वरून ६५ करावे या प्रमुख मागणीसह नुतनीकरण बंद करावे, सेवानिवृत्तीनंतर पोलीस पाटील यांना एकरकमी ठोस रक्कम मिळावी, रिक्त जागा त्वरित भराव्यात, विमा कवच मिळावे, नव्याने निर्माण होणारे आऊट पोस्ट, महानगरपालिका, नगर परिषद या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस पाटील यांना निवृत्तीपर्यंत कायम ठेवण्यात यावे, पोलीस पाटील अधिनियम दुरूस्ती अशा अनेक मागण्या संदर्भात चर्चा होऊन त्यावर उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे साहेब यांनी प्रस्ताव पाठविण्यासाठी सचिवांना सुचना दिल्या होत्या. त्यावर मंत्रीमंडळाने त्यावर लवकरच निर्णय घ्यावा यासाठी पोलीस पाटील यांची ताकद होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात दाखवुन आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे. आजपर्यत बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य मोर्चे काढण्यात आले आणि त्याचा फायदा नक्कीच झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे