0
4
8
2
9
0
आनंदाचा क्षण..
अरण्येश्वर विद्या मंदिरची प्राथमिक शाळा चार वाजता सुटली. मी रिक्षातून चालले होते. अचानक नजर शाळेचा ड्रेस घालून चाललेल्या मुलांवर गेली.त्यात गेल्या वर्षी माझ्या वर्गात असलेली माही मला दिसली. तिनेही मला ओळखले. मी पटकन रिक्षा थांबवायला सांगितली.
आईचा हात धरलेली माही माझ्याकडे धावतच आली. माझ्या कुशीत शिरली. अती आनंदाचा क्षण होता तो.
आज माझी विद्यार्थिनी भेटली. जेवढी ओढ मला तिची होते. तेवढीच तिला माझी होती. नंतर आम्ही शाळेबद्दल बोललो. अभ्यास कसा चालू आहे हे विचारले. आणि तिच्या पालकांसमवेत फोटो काढले. आणखी एक कांबळे पालक भेटले.व हे आनंदी क्षण कॅमेरात कैद केले.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा – पुणे.
0
4
8
2
9
0



