गैरमार्गाशी लढा अभियानांतर्गत पालक शिक्षक सभा संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
गैरमार्गाशी लढा अभियानांतर्गत पालक शिक्षक सभा संपन्न
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आवास मध्ये आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: शुक्रवार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात इ. १० वी व इ. १२ वी च्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभुमीवर गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत इ. १० वी व इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापक /प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी सभेच्या प्रास्तविकातून इ. १० वी व इ. १२ वी च्या बोर्ड परीक्षेबाबत व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत पालकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर धनराज फड सर यांनी परीक्षा मंडळा कडून आलेल्या सूचनांचे वाचन करून परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर साधन व्यक्ती प्रशांत ठाकूर सर, तसेच कैलास शिकारे सर, नितिन शिंदे सर, सचिन भंडारे सर, आशिष राणे सर यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत व बोर्ड परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. पालक शिक्षक सभेसाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून चर्चेमध्ये सहभाग घेतला व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
पालक शिक्षक सभेसाठी साधन व्यक्ती प्रशांत ठाकूर सर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय म्हात्रे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, इ. १० वी व इ. १२ वी चे वर्ग शिक्षक, विषय शिक्षक तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थितीत होते. सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी सभेचे सुत्रसंचलन तर सचिन भंडारे सर यांनी आभार प्रदर्शन केले.



