0
4
8
2
9
7
आंदोलन
पारतंत्र्यात ही झाली होती
स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन
स्वातंत्र्यात ही सुरू आहेत
न्याय हक्कासाठी आंदोलन
लेखणी बंद,कधी काम बंद
कधी होई धरणे आंदोलन
मुकमोर्चाने जाहीर निषेध
कधी होई आमरण उपोषण
कधी कँडल मोर्चा काढून
कधी होईल घेराव घालून
कधी रस्त्यावरती उतरून
जाळपोळ बोंबाबोंब करून
सनदशीर मार्गाने आंदोलन
कधी पार पडेल ही शांततेत
तीव्र शब्दात जाहीर निषेध
कधी आक्रमक भूमिका घेत
आरक्षण मिळवण्या करीता
कधी आरक्षण बचावासाठी
कधी खाजगीकरणा विरुद्ध
कधी जूनी पेंशन लाभासाठी
अन्याय अत्याचार क्रूर हत्या
शृंखला चालूच होते सुन्न मन
अजूनही स्त्री सुरक्षित नाही
लढावा लढा तीव्र आंदोलन
बी एस गायकवाड
पालम,परभणी
==========
0
4
8
2
9
7



