‘आवास’मध्ये हनुमान मंदिरात अखंड हरीनाम,भजनसेवा
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
‘आवास’मध्ये हनुमान मंदिरात अखंड हरीनाम,भजनसेवा
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
रायगड: अलिबाग तालुक्यातील आवास गावात फार पूर्वीपासून आवास ग्रामस्थांतर्फे गावातील हनुमान मंदिरात श्रावण कृष्ण प्रतिपदे पासून सात दिवस हरीनाम सप्ताह करण्याची परंपरा रुढ होती. त्यात बदल होऊन गेल्या काही वर्षांपासून श्रावण कृष्ण प्रतिपदेला सकाळी ८.०० ते श्रावण कृष्ण द्वितिया सकाळी ९.०० वाजे पर्यंत अखंड हरीनाम, भजन सेवा करण्याची परंपरा रुढ झाली.
या परंंपरेनुसार ह्या वर्षीही मंगळवार दि. २० अॉगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.०० ते बुधवार दि. २१ अॉगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजे पर्यंत गावातील हनुमान मंदिरात आवास ग्रामस्थांतर्फे अखंड हरिनाम, भजन सेवा करण्यात आली. यामध्ये सर्व आवास ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने सहभागी झाले.
त्यानंतर प्रथेप्रमाणे हनुमान मंदिरातून हनुमानाच्या पालखीचे प्रस्थान झाले. हरीनामाचा गजर करीत पालखी गावातील खांबळेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, गणपती मंदिर, गावदेवी जोगेश्वरी माता मंदिर, सोमेश्वर मंदिर, राम मंदिर व विठ्ठल रखुमाई मंदिरात नेण्यात आली. त्यानंतर शेवटी पुन्हा पालखी हनुमान मंदिरात आणून आरती करण्यात आली.



