ज्ञानकोशकार डॉ. केतकर जयंती साजरी
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
ज्ञानकोशकार डॉ. केतकर जयंती साजरी
केतकर कुटुंबियांची उपस्थिती
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे. दि.५फेब्रु.(प्रतिनिधी) कथाभारती व्यासपीठ आणि केतकर कुलसभा यांच्या वतीने ज्ञान कोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कमला नेहरू उद्यान येथील कोशकारांच्या स्मारकाजवळ साज-या झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते डाॅ.श्रीधर केतरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमात प्राचार्य श्याम भुर्के यांनी केतकरांच्या साक्षेपी कोश कार्याचे मोल सविस्तरपणे विशद केले. कथाभारतीच्या डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी श्रीधर केतकरांच्या “माझा १२वर्षांचा प्रवास”या पुस्तकाच्या आधारे त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. श्री. नितीन केतकर यांनी श्रीधर केतकरांचे कोशकार्य विविध स्तरावर सर्वदूर पोहचले पाहिजे, असे मत मांडले.
यावेळी केतकर कुलातील संजय केतकर,प्रकाश केतकर यांच्यासह सर्व केतकर कुटंबिय आवर्जुन उपस्थित होते. तसेच, ग्रंथालयाचे अविनाश चाफेकर,श्री. नवरे आणि गीता भुर्के ई. मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले.



