Breaking
आरोग्य व शिक्षणकविताकोकणक्रिडा व मनोरंजनखानदेशचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

वास्तवात मरणारं, एखाद्याचं स्वप्नं म्हणजे ‘मरणयातना’; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 0

वास्तवात मरणारं, एखाद्याचं स्वप्नं म्हणजे ‘मरणयातना’; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण

फक्त चेहरा पाहिला तरी त्याला सगळं समजायचं, गरजच नव्हती शब्दांची’. कधी कधी मलाही कळायचं नाही मला काय हवंय ते. पण त्याला बरोबर समजायचं. मला माझ्यापेक्षाही जास्त ओळखायचा तो. आज तोच पुढ्यात येऊनही अनोळखीपण दाखवून गेला. तो आयुष्यात नसला तरी आठवणी जशाच्या तशा ताज्या आहेत. कदाचित त्या आठवणींना कधीच म्हातारपण येणार नाही. पण… आजचं हे अनोळखीपण मनात असंख्य जखमा करून गेलं. मरणयातना याहून वेगळ्या काय असतील? आयुष्यभर ज्याला हृदयात जपून ठेवलं, आज तोच दोरा स्वतः जळत तिला जाळत होता. ते पाहून वाटले ती मेणबत्ती जळत होती की रडत होती.. कदाचित मरणयातना अनुभवत होती.

कु-हाडीचे घाव होत होते नि ते झाड देहभर गदगदत होते. कदाचित म्हणत होते. त्या कु-हाडीकडून काही अपेक्षाच नव्हती रे, पण हा दांडा.. तो तर माझाच सगा.. तरीही घाव घालतोय.. तेच.. तेच सहन होत नाही मला. अनुभवत आहे मरणयातना. परक्यांनी दिलेले घाव फक्त वेदना देतात पण आपल्यांनी दिलेले.. मरणयातना..! गगनभरारीचं वेड असणाऱ्या गरूडाचे पंख कापले तर, डोळ्यात चित्र साठवून हातांनी ते कागदावर उतरवणारी नजरच दृष्टी हरवून‌ बसली तर.. काय वाटेल त्या मनाला?

हे लिहिता लिहिता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी सांगितलेली एक हृदयस्पर्शी आठवण आठवली. गळ्याचं ऑपरेशन करतेवेळी भूल देण्याआधी डाॅक्टरांना त्यांनी सांगितलं, ‘या ऑपरेशनमुळे माझे सप्तसूर हरवणार असतील तर मला जिवंत ठेवू नका. हे स्वर माझ्या आयुष्यात नसतील तर मरण परवडले पण त्या मरणयातना नको.’ एखाद्याचं स्वप्नच वास्तवात मरणार असेल तर त्या मरणयातनाच नव्हेत काय?

आज चित्रचारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र मरणयातनांची प्रचिती देणारे. तो गेला नि तिची पिल्लं जणू उघडी पडली. संसार सागर तरून जाण्यासाठी ती हिंमत बांधतेय, पण दुष्ट नजर टपली आहे तिच्यावर, दुरवर किनारा, भवताल पाण्यानी वेढलेला, आधाराचा तारू जिवावर उठलेला.. त्यात अडकलेली आई व तिची मुले.. कसं देणार मुलांना सुरक्षित जीवन नि अनुभवाचे ज्ञानकण.. ही सभोवतालची संकटं पाहून तर केवळ आकांत होतोय मनाचा.. आकांत करणारी मुले पाहून त्या आईचे काळीज फाटत नसेल काय? स्वतःपेक्षा माझ्या पिल्लांचं आता काय होईल या विचाराने मनात मरणयातना येत नसतील काय? आज आपणा सर्वांच्या रचनेतून मरणयातना अधोरेखित झाल्याच, शिवाय परमेशावरील दृढ विश्वास.. आशावादी रचनेतून मनात दिप लावून गेला. शंभूराजेंना आठवत स्फुल्लिंग निर्माण झाले. वैविध्यपूर्ण आशयघन रचनांसाठी सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

सौ स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक, लेखिका, कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

4/5 - (4 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे