0
4
8
2
9
0
तगमग
होते जीवाची तगमग
सांगावी कशी कुणाला?
एकटेपणाची जाणिव
वाटे नित्य समयाला
वय झाले आता साठी
जगाव लागते एकटे
करणारे ना कुणी पाठी
तगमग होई जीवन वाटे
नाते असो रक्ताचे वा
परके शेजारी संबंध
वेळ ना कुणाला इथे
ऐकायला दुःखाचे द्वंद
जो तो आहे रममाण
मुलेबाळे नी संसारात
वेळ नाही कुणाकडे
शब्द दोन बोलण्यात
कधी आजारी,कधी एकटी
साथ कुणाची मिळेना साधी
होतो जीव लाही लाही
मिळणार का शांती कधी
तगमग या जीवाची कधी
संपणारच नाही का?
करून मग ईश्वरचिंतन
मार्ग तो दाखवेल हवा
सुलोचना लडवे
जि.अमरावती
=====
0
4
8
2
9
0



