Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनखानदेशमहाराष्ट्र

वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे प्रजासत्ताक दिनी पारितोषिक वितरण

जिल्हा प्रतिनिधी, नंदूरबार

0 4 8 3 0 1

वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे प्रजासत्ताक दिनी पारितोषिक वितरण

जिल्हा प्रतिनिधी, नंदूरबार

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नंदूरबार/ पाडळदा (दि २७ जानेवारी): पाडळदा येथे वल्लभ विद्यामंदिर पाडळदा तसेच आदर्श प्राथमिक येथे संस्थेचे चेअरमन श्री दत्तात्रय सोमजी पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी व्हा चेअरमन श्री विजय लिमजी पाटील , ज्येष्ठ संचालक रमेश शंकर चौधरी, रतिलाल पाटील, जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, सुभाष पाटील आदी सर्व संचालक तसेच ग्रामस्थ ,मुख्याध्यापक अंबालाल चौधरी, पर्यवेक्षक गणेश पाटील, प्राथमिकचे योगेश सोनार तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

ध्वजवंदनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रभक्तीपर गीतावर संगीतसह कवायत घेण्यात आली. तसेच विविध स्पर्धा तसेच इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी मध्ये वार्षिक परीक्षेत प्रथम येणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना समाजाकडून मिळालेल्या देणगीच्या व्याजाच्या रकमेत देणगीदारांच्या नावे पारितोषिके देण्यात आली.

ही समाजसहभागातून आलेल्या देणगीच्या व्याजाच्या रकमेतूनच कायमस्वरुपी पारितोषिक देण्याची आदर्श प्रथा शाळेने पूर्वापार कायमस्वरूपी टिकवून ठेवली आहे. शिवाय मागील वर्षापासून ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांक प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाते.

पाडळदा येथे प्रजासत्ताक दिनी विविध कार्यकारी सोसायटीत चेअरमन जगदीश रोहिदास पाटील यांचे हस्ते, ग्रामपंचायत कार्यालय , उपसरपंच रविंद्र सखाराम पाटील जि.प.प्राथमिक शाळा सामाजिक कार्यकर्ता दिपक पाटील,तसेच आदर्श प्राथमिक व वल्लभ विद्यामंदिर माध्यमिक शाळा येथे संस्थेचे चेअरमन दत्तात्रय सोमजी पाटील यांचे हस्ते अशा विविध ठिकाणी ध्वजारोहण व ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत पाडळदाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, संस्थेचे संचालक , ग्रामस्थ , पालक, सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. सूत्रसंचलन ज्येष्ठ क्रिडा शिक्षक चतूर पाटील सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे