आरोग्य व शिक्षणई-पेपरछत्रपती संभाजी नगरमराठवाडामहाराष्ट्र
श्री स.भु.प्रशाला बालानगर येथे रज्जू चिलवार यांचा सेवापूर्ती गौरवदिन संपन्न
पद्माकर वाघरूळकर ईश्वर कसबे, प्रतिनिधी
0
4
8
2
9
0
श्री स.भु.प्रशाला बालानगर येथे रज्जू चिलवार यांचा सेवापूर्ती गौरवदिन संपन्न
पद्माकर वाघरूळकर
ईश्वर कसबे, प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
बालानगर दि.३१ (प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील श्री सरस्वती भुवन प्रशाला बालानगर येथे सहशिक्षिका रज्जू दामोधर चिलवार मॅडम यांचा आज (दि ३१ डिसे.) सेवापूर्ती गौरवदिन संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, प्रमुख पाहुणे स्थानिक शालेय समिती अध्यक्ष सत्यनारायणजी सोनी उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या वतीने तर प्रशालेतर्फे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड व सारिका तोडकर यांनी स्वागत सत्कार केला.
आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पद्माकर वाघरूळकर यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेतील सर्वच शिक्षक शिक्षकेतर सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
0
4
8
2
9
0



