कवितानागपूरबीडमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
होईल ना प्रेम शर्मिला देशमुख -घुमरे केज रोड,जि.बीड
0
4
8
2
8
4
होईल ना प्रेम
केला सन्मान दुसऱ्यांचा
सोसून मनावर घाव
पाहिली न वेदना
ना अंतरीचा गाव
कर्तव्याच्या ओझ्याखाली
मरणयातना सोसतांना
पाहिले ना मी डोळ्यांनी
नशिबीच म्हणून भोगतांना
पदोपदी केला ना
मीच माझा अपमान
असून सक्षम ही
घेतला कमीपणाचा मान
पेटून उठणाऱ्या शब्दांचा
घोटला मीच गळा
मने सांभाळता इतरांची
वाळवला आनंदाचा मळा
स्वअस्तित्व झिडकारून
केले प्रेम दुसऱ्यावर
विचारतेय अखेरच्या वळणावर
होईल ना प्रेम स्वतःवर
शर्मिला देशमुख -घुमरे
केज रोड,जि.बीड
======
0
4
8
2
8
4



