0
4
8
2
9
0
प्रेम
प्रेमाचा गोडवा । सर्वांनी चाखावा
नको तो देखावा । करू नये ॥१
अमूल्य तो ठेवा । जपून ठेवावा
प्रेमात असावा । विश्वास तो ॥२
प्रेमाचे महत्त्व । जाणूनीया घ्यावे
सार्थकी लावावे । एकमेका ॥३
प्रेमात असावी । निर्मळ भावना
समजूनी ध्याना । सारेजन ॥४
प्रेम दयावे घ्यावे । प्रेमाने वागावे
आपले मानावे । सकलांना ॥५
दिपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
========
0
4
8
2
9
0



