0
4
8
2
4
2
लोकभ्रम
देगा हरी पलंगावरी
ही मन आहे प्रख्यात
करावा लागत नाही कष्ट
ही मन घर करून आहे मनात
कष्टा शिवाय पैसे नाही
अन्न शिवाय जीवन नाही
हा आजचा आहे नारा
तसल्या लोकभ्रमाला अर्थ नाही
लोकभ्रम तुटणारा विश्वास
आपल्याच कामाचा सत्यानाश
अशुद्ध होत असतो मन
कसे जगणार हो आपले जीवन
स्व,,मनावर ठेवा विश्वास
लोकभ्रमास पडू नका बळी
सकारात्मक विचार ठेवा जागृत
नाहीतर लागणार मनाला आळी
लोकभ्रम केव्हा असतो खोटा
आपलाच होत असतो तोटा
बघा काय खोटे काय खरे
वाहत असतात भ्रमाचे वारे
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
==========
0
4
8
2
4
2



