Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

ग्रंथालय भारतीचे एस. आर.रंगनाथन यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 3

ग्रंथालय भारतीचे एस. आर.रंगनाथन यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे-दि.21ऑ(प्रतिनिधी) महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था आणि ग्रंथालय भारती यांच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून प्रसिध्द असलेले पद्मश्री एस.आर.रंगनाथन यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. गो. बं .देगलूरकर, श्री. रवींद्र गुर्जर आणि श्याम भुर्के हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून ऊपस्थिती होते.

ग्रंथालय भारतीच्या डाॅ अनुजा कुलकर्णी यांनी कार्यक्रमात प्रास्ताविक भूमिका मांडून एस.आर.
रंगनाथन यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला आणि ग्रंथालय भारतीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री. अविनाश चाफेकर आणि प्राचार्य श्याम भुर्के यांनी पद्मश्री रंगनाथन यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करून त्याचवेळी थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या रण झुंझार व लढवय्या चरित्राचे ऐतिहासिक दाखले देत त्यांच्या जीवनातील काही रोमांचक प्रसंगाचे वर्णन करीत पेशवाईच्या स्मृती जागवल्या.

कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच श्री. अविनाश नवरे , श्री.दिलीप भिकुळे आणि जिजामाता ग्रंथालयाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे