0
4
8
2
9
5
निघालो आम्ही
वाटेवरचे काटे तुडवत
निघालो आम्ही
ठेचा किती लागल्या
तरी निघालो आम्ही
ओठावर नारा जयभीमचा
हृदयात जागर संविधानाचा
घेऊन निळा झेंडा
निघालो आम्ही
तमा नाही उपाशी पोटाची
नाही पर्वा वादळ वाऱ्याची
निसर्गालाही देत टक्कर
निघालो आम्ही
फुलला परिसर दिक्षाभूमीचा
भरून आला ऊर कधी केव्हा
भरल्या नयनी पहात उजेड
निघालो आम्ही
लावला मातीचा टिळा माथी
आठवता बाबा कंठ दाटला
शब्द फुटेना निःशब्द तरीही
निघालो आम्ही, निघालो आम्ही
सविता धमगाये
ता. जि.नागपूर
0
4
8
2
9
5



