Breaking
कवितानागपूरमराठवाडासाहित्यगंध

मेजवानी; मीनाक्षी काटकर

यवतमाळ

0 4 8 2 8 4

मेजवानी

आज पहिला दिवस
भाजीपाला घालून बनवा मला
बोलला कसा व्हेजिटेबल पुलाव
पौष्टिकतेसह चव येईल तोंडाला

आज दुसरा दिवस
बनवा बोलला मसालेभात
शिजवू टाकून बटाटे मसाले
राहतील सगळे बोटे चोखत

आज तिसरा दिवस
वाटाणा घालून मटारपुलाव
आवडेल सगळ्यांना खूपखूप
खाऊ लागला भलताच भाव

आज चौथा दिवस
बनवूया मुगडाळ खिचडी
त्याच्यासंगे करूया
जमलं तरच कढी

आज पाचवा दिवस
लागेल आज नंबर
चवळीच्या खिचडीचा
आस्वाद घेऊया नवपाककृतीचा

आज सहावा दिवस
घालून चण्याचे गोळे
बनवा बनवा चनापुलाव
चिंचकढीसह वरपतील सगळे

आज सातवा दिवस
सोयाबीनच्या घालूनी वड्या
बनवा सोयाबीन पुलाव
खाऊन मुले मारतील उड्या

आज आठवा दिवस
मसुरडाळ अन् मेथीपाने
बनवा बनवा मसुरपुलाव
खातील सगळे आनंदाने

आज नववा दिवस
ऐटीत बोलला अंडापुलाव
फोडणी घालून तांदूळ घालू
मग अंडी मिसळून शिजव

आज दहावा दिवस
तेल,मसाले,तिखट घालून
मोड आलेल्या मटकीची
टाकूया झक्कास उसळ बनवून

आज अकरावा दिवस
मुगडाळ तांदूळ एकत्र शिजवून
नंतर घालू साखर/गूळ
गोडभात टाकू बनवून

आज बारावा दिवस
भात साधाच घ्या शिजवून
शेवगा घालून बनवा वरण
गरमागरम घ्या खाऊन

संपल्या आता पाककृती
लगेच बोले खीरताई
चार दिवस बनवा मला
एक दिवस नाचणीताईला

उठले सलाद आले पुढे
मटकी,वाटाणा,चने,मूग
भिजवा अन् आणा मोड
सगळे घालून चटपटीत बनवा मग

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
========

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे