“भेटीची ओढ लागे जीवा”; सीमादेवी बेडसे
मराठीचे शिलेदार समूह
“भेटीची ओढ लागे जीवा”; सीमादेवी बेडसे
सकाळीच दादांचा मेसेज पाहिला की, ‘ तुमचा फोटो पाठवा ‘ खूप दिवसांनी हा मेसेज आला होता…कारण खूप दिवसांनी चारोळी लिखाण केले ते सर्वोत्कृष्ट ठरले म्हणून खूप आनंद झाला आणि पटकन फोटो पाठवला. जेव्हा समूहात मी वाचत होते की, फोटो न पाठवल्यामुळे सर्वोत्कृष्ट चे पोस्टर बनवता आले नाही , तेव्हा खूप वाईट वाटायचे की वेळ न मिळाल्यामुळे मी रचना लिहू शकत नाही,व ज्यांनी लिहिली आहे त्यांना त्याचे महत्व नाही. असो…
आ.विष्णू दादा म्हणतात त्यास मी ही सहमत आहे. मराठीचे शिलेदार समूह, प्रतिभावंतांचा महा दरबार येथे मी एक मामुली शिपाई ठरलो सन्मानाचा हकदार…!या उक्तीप्रमाणेच मीही प्रकाशमय प्रतिभावंतांमध्ये एक छोटासा काजवा आहे. आणि तुम्हा सर्व सारस्वतांसोबत या मराठीचे शिलेदार समूहात पोहत आहे. मागीलवर्षी बुलढाण्यात येता नाही आले परंतु ७ मे ला छत्रपती संभाजी नगरात आपणा सर्वांना भेटण्याची ओढ चातकाप्रमाणे लागली आहे.
माझ्या “हाच शाश्वत आधार” रचनेचा सर्वोत्कृष्ट चा सन्मान दिल्याबद्दल समूहाचे सर्वेसर्वा आ.राहुल दादा पाटील, प्रिय सखी सवू, स्वातीताई, वैशाली ताई, वृंदाताई, तारकाताई, शर्मीलाताई आ.विष्णू दादा,संग्राम दादा,उरकुडे दादा,अशोक दादा,व समूहातील सर्व दादा – ताई यांचे मनःपूर्वक खूप खूप आभार…
भेटूया मग ७ मे ला..!
श्रीमती सिमादेवी बेडसे चाळीसगाव
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह



