पुण्याच्या वसुधा नाईक ‘शिक्षणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुण्याच्या वसुधा नाईक ‘शिक्षणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे: शहरातील तितिक्षा इंटरनॅशनल आणि भारतीय विचारधारा आयोजित ‘कथा शिक्षणाची- प्रचिती ज्ञानदानाची ‘या अंतर्गत तितिक्षा शिक्षणाचार्य पुरस्कार वितरण सोहळा व निमंत्रितांचे काव्य संमेलन (दि.५) २०२४ रोजी संपन्न झाले. यासोबतच तितिक्षा ” शिक्षणाचार्य पुरस्कार २०२४” हा सभारंभ पत्रकार भवन नवी पेठ मुख्य सभागृहात संपन्न झाला.
या समारंभात डॉ. न. म. जोशी,डॉ. निशिकांत श्रोती, ऍडव्होकेट शार्दुल जाधव, मंदाताई नाईक, प्रा. शरदचंद्र काकडे,डॉ. मधुसूदन घाणेकर, भारती महाडिक, प्रिया दामले इत्यादी मान्यवर होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण क्षेत्रातील सौ.वसुधा वैभव नाईक , प्रा. जयंत खेडकर, सौ. मेघना जोग, दीपा पराडकर, सुहासिनी दीक्षित यांना शिक्षणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दीपस्तंभ पुरस्कार- जाधवर ग्रुपचे ऍडव्होकेट आणि मा. सुधाकर जाधवर यांचे सुपुत्र शार्दुल जाधव यांना पुरस्कृत करण्यात आले. सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार – मा.वि. ग.सातपुते सरांना सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कल्पकता रत्न पुरस्कार – गौरव पुंडे यांना कल्पकता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये निमंत्रित कवींचे काव्य सादर झाले. अजय मुळीक, मा.विजय सातपुते, योगेश हरणे, दीपाराणी गोसावी इत्यादींच्या सहकार्याने कार्यक्रम सुंदर झाला.



