Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

‘आभारीय मनोगत’; डॉ संजय पाचभाई

0 4 8 2 8 6

आभारीय मनोगत’; डॉ संजय पाचभाई

मले का करा लागते…!

सकाळी सकाळी ‘राहुल’ सरांचा मेसेज दिसला फोटो पाठवा आणि काल लिहिलेले बालकाव्य पण पाठवा. मी विसरूनच गेलो होतो कि, मी बालकाव्य पण लिहिले होते. चार समूहात चार रचना टाकून निवांत होतो. मग माझ्याच अकाऊंट वर शोधाशोध केली त्यात रचना, त्रिवेणी पुन्हा लयी पसारा होता, कसेतरी हुडकली आणि दिली पाठवून.

मलाही बालकाव्य आता जमायला लागले आणि तुमच्या पंगतीत बसायचा जो मान मिळाला तो शब्दातीत आहे. आदरणीय राहुल सर, परीक्षक मंडळ समूहातील माझे सर्व स्नेही यांचे मनःपूर्वक धन्यवाद. माहे मनोगत आणं पांचटगिरी नायी असं कसं होईन आणं इषय बी गालगुच्चा मंग तं इचारता सोय नायी.कारण का अंदून मंदून लिचूडा घेतल्या बगर मायी सकार होतच नायी.

कवा कवा सकारी तिनं चाय आणला का तिले मिठीत घ्याची खोड अजून बी जिरली नायी मंग ते असा जोरानं लिचूडा घेते का गाल लाल होते. पयलंच मी पांढरा फटक जरा जास्तस उमटून दिसते. मायी बुड्डी बी सकारी सकारी लयी घोरते तवा मीबी आपला बदला घेवून घेतो. एकगण असंच ते पक्की घोरता घोरता थांबून गेली आणं एकदम शांत झाली मले भेव वाटलं मणलं बुड्डी खसकली का बावा मणूण पक्का जोरात लिचूडा घेतला तिनं असा ठोसा मारला राजेहो का माये दातं अजूनबी हालते, अजूनबी कोंबडीचे हाडूक चावाले जमत नायी मंग मणतो

“हाडक्यानं दुखते दात वं,
बुड्डे रस्सा रस्सा वाड वं..”

चाला बाप्पा बूड्डी उटली दिसते. देईन थंड पाणी टाकून तिचा कायी नेम नायी, आणं हुडहुडी भरली तं उबदार स्पर्श बी आता करू देत नायी, तुमचं बरं हाहे बाप्पा…..!!

‘मृद्गंध’ डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे