0
4
8
2
9
0
लेखणीचे शस्त्र
रचना वाचणाऱ्यांनो
ऐका शब्द लेखणीचे
वर्तमानात जगण्यास
शस्त्र आहे कवितेचे
नको नुसती करमणुक
विचार जोडा जीवनाशी
दिलेल्या या शब्दांतून
शोधा सत्य स्वतःशी
आचार-विचारांतूनच
शुद्ध शब्द होती पावन
बोचतील हृदयात जरी
दाखवितील खरे जीवन
कोण वाचते ही रचना
ठाऊक नसते आम्हास
भेटीत जेव्हा सांगतात
“वाचक आम्ही रचनेस”
आनंद होतो त्या क्षणी
मन भरून येते आत
तुमची प्रतिक्रिया पाहता
आनंद मावेना गगनात
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
0
4
8
2
9
0



