
0
4
8
2
8
2
प्रेमांगण
सुने सुने वाटते मज
तुजवीण हे प्रेमांगण
तुझ्या प्रेमाने फुलव
प्रिया मज हृदयांगण
तळमळ माझी होते
कधी तू बोलत नाही
ठरलेली वाट आपली
तू सख्या चालत नाही
का तुला कळला नाही
भाव माझ्या मनातला
आता क्षण क्षण सरतो
माझा फक्त विरहातला
गंधाळता ही रातराणी
फुलते तुज प्रेम उरी
स्वप्नच भासते आता
नजरेची ती जादूगरी
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल जि.चंद्रपूर
==========
0
4
8
2
8
2



