0
4
8
2
9
0
अपराजिता
कोमल मृदू मुलायम जरी
तेवढीच कठोर पण आहे
झुंज देऊन कठीण काळी
विजयीश्री खेचनारी आहे
अडीअडचण,खाचखळगे
मार्गक्रमण करणारी आहे
संकटांना तोंड देत सामोरे
उभी मी अपराजिता आहे
काट्याकुट्याच्या वाटेनेही
मार्गक्रमण करणारी आहे
वादळवारा न पाऊसधारा
दिशादर्शक ठरणारी आहे
घेतलेल्या अग्नीपरिक्षेतून
तावून सुलाखून निघणारी
लेकरा करीता बुरुजावरुन
रात्रीअपरात्रीही उतरणारी
दीर्घकाळ अवकाशयानात
परी डगमगली ना सुनिता
यानातून उतरताच हसली
भारावून गेली अपराजिता
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
4
8
2
9
0



