0
4
8
2
8
4
नवांकुर
दाही दिशा दौडत, वळीवाचं मेघ गर्जत आलं
भेगाळल्या धरणीचं, निब्बर ढेकूळ मऊ झालं..//
लगभग बळीराजाची,मशागतीला हात लागलं
नांगरट कुळवट धांदल, रानाला रूप लाभलं..//
पावशा घू च्या स्वरानं, अवघं शिवार जागवलं
संकेत मृग रोहिणीचं,जणू मेघराजांनं कळवलं.. //
ओटी बांधून पोटाला, घरधनीनं भार सावरलं
सर्जा राजाच्या जोडीनं, धन्यानं सारं आवरलं.. //
कूरीवर मूठ रिती झाली, मातीत बी रूजवलं
आभाळमाया बरसली, नवं नवांकुर उगवलं ..//
हलकेच पोफडं सारून, कोवळं रोप डोकावलं
हिरवगार शिवार पाहून, बळीचं मन सुखावलं..//
फुटू लागलं एकेक पान, दान सत्पात्री पडलं
नवांकुराच्या पोटरीतच, सपान बळीचं दडलं.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
==============
0
4
8
2
8
4



