ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजीनगरमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध
वज्रमूठ
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0
5
4
1
0
2
वज्रमूठ
एकीने वळेल जेव्हा
वज्रमूठ कमजोरांची
बांधली जाईल तेव्हा
इथे मोळी मुजोरांची.. //
सारे काही बघूनही
सर्वसामान्य निष्क्रिय
मग मूठभर धटिंगण
तेव्हाच होती सक्रीय.. //
जनतेचे सोयीचे मौन
सहज पथ्यावर पडते
नसे कायद्याचा धाक
म्हणून अघटित घडते.. //
दुष्ट प्रवृत्तीचा करावा
संघटितपणे प्रतिकार
वळवून अशी वज्रमूठ
खवळून व्हावा प्रहार.. //
फक्त एकदा तरी इथे
सामान्य उठावा पेटून
आरेरावी दादागिरी
काढावी समूळ ठेचून.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
5
4
1
0
2



