Breaking
कवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

जाणीव हवी

बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

0 4 8 2 9 0

जाणीव हवी

उन्हातान्हात राबणाऱा बाप
धावतो तुझ्या भविष्यापाठी
अनवाणी फिरतो रानोमाळ
तुज पायीच्या पादत्राणासाठी

सुटाबूटांसाठी सानुल्यांच्या
पहाटेच जुंपून घेतो कामाला
सोय नसते तव कपड्याची
ठिगळाचाच अंगरखा देहाला

दीन जरी परी असे स्वाभीमानी
ना वाकला ना झुकला लाचारीने
झगडला झुंजला परिस्थितीशी
उभा अजूनही तसाच ताठ मानेने

कर्तव्य बापाचे सारे निभावतो
ढेकळातले ओरखडे अंगावरती
जाणीव हवी तुज जबाबदारीची
तळपायालाही काटेकुटे टोचती

चंदनापरी झिजवली त्याने काया
आयुष्याची बाळा केली माती
कर्तृत्वाचा तुझ्या वाजव डंका
उतारवयात मिळू दे सुखशांती

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे