0
4
8
2
9
3
दुथडी
मन झालेया जाया पंढरीला
–विठुरायाला भेटना
आतुर जीव वेडापिसा
सावळ्या हरीच्या दर्शना
बेभान सुटला वारा
मुसळधार पावसाच्या धारा
चंद्रभागा भरली देवा
दुथडी वाहते नदीसारा
अलीकडे डोंगर उभा
पलीकडे दरी खोरी
मध्येच अडकले देवराया
दुथडी वाहते सारी
भक्ती रसात रंगले
तुझ्या नामात दंगले
आस मनी लागली
देहभान सारे विसरले
पुष्पा डोनीवार
बाबूपेठ,चंद्रपूर
===========
0
4
8
2
9
3



