Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

जे.एस.एम.कॅम्पसमध्ये विधी साक्षरता शिबीर

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

जे.एस.एम.कॅम्पसमध्ये विधी साक्षरता शिबीर

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: शुक्रवार, दि.११ जुलै २०२५ रोजी, सकाळी १०:३० वा.ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेज, जे.एस.एम.कॅालेज आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिराचे जे.एस.एम.कॅम्पसमध्ये आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग,सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे ,वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांनी लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत मार्गदर्शन करताना युवांनी सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैयक्तिक सुधारणा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.तसेच बालविवाह आणि लोकसंख्या वाढ टाळण्यासाठी युवांनी स्वतःच्या जाणीवा आणि संवेदनशीलता वृद्धिंगत करण्याची गरज आहे असे आवाहन केले.
कायदेशीर मदत आणि बचाव सल्लागार प्रणालीचे प्रमुख मा.ॲड.चंद्रशेखर कामथे यांनी लोकसंख्या दिन या विषयावर मार्गदर्शन करताना युवांनी सार्वजनिक भान ठेवत,समाज माध्यमांचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली.तसेच कामाच्या ठिकाणी होणार लैंगिक छळ याविषयाला अनुसरुन Prvention of Sexual Harassment at Wokplace POSH) आणि The Protection of Children From Sexual Offences Act(POCSO) यामधील तरतूदींची सविस्तर मार्गदर्शन केले.लोकसंख्येची वाढ होत असतानाच बालकांविषयीच्या समस्या कश्या गंभीर होत चालल्या आहेत याविषयी विश्लेषण केले.कायदेशीर मदत आणि बचाव सल्लागार प्रणालीच्या उप प्रमुख ॲड. मनिषा नागावकर यांनी बालविवाहामुळे समाजात स्त्री आणि जन्माला येणारे मूल यांच्या आरोग्याविषयक समस्या तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा यामधील तरतूदींविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिले.शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अलिबागमधील सहाय्यक प्रा.देवोदत्त सूर्यवंशी यांनी लोकसंख्येचा विस्फोट,
स्थलांतरामुळे मोठ्या शहरातील नैसर्गिक स्त्रोतांवर येणारा ताण, पर्यावरणाची होणारी हानी याविषयावर सखोल माहिती दिली.
लोकसंख्येविषयी चर्चा करताना त्यांनी महिला सक्षमिकरणाचे महत्व विशद केले.स्त्रियांचे शिक्षण आणि स्वातंत्र्य हे लोकसंख्येच्या विस्फोटापासून जगाला वाचवू शकते असे प्रतिपादन त्यांनी केले.लॅा कॅालेजचे प्रा. डॅा.संदिप घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
जे.एस.एम.महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॅा.पी.बी.गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच लॅा.कॅालेजच्या आय.क्यु.ए.सी.समन्वयक प्रा.निलम म्हात्रे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या शिबीराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड गौतम पाटील, उपाध्यक्ष डॅा.साक्षीपाटील ,जे.एस.एम.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॅा.सोनाली पाटील,लॅा कॅालेजच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे यांनी मार्गदर्शन केले. लॅा कॅालेजमधील लिगल एड सेलतर्फे प्रा.चिन्मय राणे,प्रा.पियुषा पाटील,प्रा.कौशिक बोडस,प्रा.सुरज पूरी तसेच. जे.एस.एम.महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा.डी.जी.खंदारे,प्रा.महेंद्र पाटील यांनी शिबीराचे आयोजन केले.या शिबीरामध्ये लॅा कॅालेज डी.एल.एल.ई विभाग,जे.एस.एम.महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डाॅ. निळकंठ शेरे, एन.एस.एस.विभाग तसेच भूगोल विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे