0
4
8
2
9
0
अनुभव
आज उद्या म्हणता म्हणता
दिवस महिने टळून गेले
सुखाच्या शोधात मात्र
वय हातचे ढळून गेले
पडता काळ होता तेव्हा
क्षण सुद्धा छळून गेले
काही स्वप्न जीवंतपनीच
आत मनामध्ये जळून मेले
पैशाशिवाय काही नाही
हे मलाही आता कळून गेले
अडचणीत साथ सोडून
नातेवाईक सुद्धा पळून गेले
नजरा नजर चूकवू काही
मुद्दाम मला टाळून गेले
ज्यांना जपले मनामध्ये
तेच जीव जाळून गेले
कडा कोरड्या डोळ्याच्या
आसवे सारे गळून गेले
बहरलेल्या आयुष्याचे
हिरवेपन वाळून गेले
प्रकाश पुंडलिक गोधने
ता.कंधार जि.नांदेड
=
0
4
8
2
9
0



