आधुनिकतेमुळे आदिवासी संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर- प्रा. डॉ. नामदेवराव हटवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आधुनिकतेमुळे आदिवासी संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर- प्रा. डॉ. नामदेवराव हटवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली: आधुनिकतेमुळे जंगलातील अस्तित्वात असणारी आदिवासी संस्कृती ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नोकरीच्या निमित्ताने शहरात आलेले आदिवासी समाज बांधवांना त्यांच्या मुलांना गोंडी भाषा येत नाही तिचा ऱ्हास होताना दिसून येत आहे.
गोठूल परंपरा ही नष्ट होत आहे जी की आदिवासी समाजाची सांस्कृतिक देवाण-घेवाण केंद्र युवा पिढीसाठी होती या संस्कृतीला जोपासण्याची जबाबदारी आता आधुनिक पिढीवर असल्याचे मत मनोहर भाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. नामदेव हटवार यांनी व्यक्त केल. ते गोंडवाना विद्यापीठात आयोजित इतिहास परिषदेला आदिवासी इतिहास कला, संस्कृतिक आणि वर्तमान समस्या या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रसंत महाराज नागपूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एम आय कोरेटी होते तर प्रमुख उपस्थिती डॉ. जगदीश हेडवे डॉ.रुपेश मेश्राम ,डॉ. जयंत काकडे यांची होती . अध्यक्षीय मार्गदर्शनपर डॉ. कोरेटी यांनी आदिवासी संस्कृतीवर विस्तृत प्रकाश टाकून अजूनही आदिवासी संस्कृतीला टिकवून ठेवण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रमोद बोधाने तर आभार प्रदर्शन डॉ. नंदकिशोर मने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रवींद्र लोणारे डॉ. प्रफुल्ल नांदे डॉ. नरेश मडावी डॉ. संतोष सुरडकर यांनी परिश्रम घेतले.



