Breaking
कवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

रूप हे सुंदर

अशोक महादेव मोहिते बार्शी,जिल्हा सोलापूर

0 4 8 2 9 7

रूप हे सुंदर

रंगरूप लाभले तुला सुंदर
लागू नये माझीच नजर!
आईबाबांचे उपकार थोर
कौतुकाची थाप पाठीवर!

मैत्रिणी सोबतीला ग चार
काढावी तुझीच मी नजर!
वाटते मला पहावे बारबार
या सौंदर्याचा ग रंगबहार!

केली प्रतीक्षा मी आजवर
मनास भावला चेहरा फार!
बोललो मी तुला हे वारंवार
करावा प्रेमाचा तू स्वीकार!

नाराज नको ना माझ्यावर
एकांताचे वारे वाही थंडगार!
गुलाबी स्वप्न व्हावे साकार
इच्छापूर्तीस नसतो नकार!

गोड हसू खेळते गालावर
फिरते नजर माझी चौफेर!
आवडतेस मजला तू फार
झेलतो पाऊले तळहातावर!

अशोक महादेव मोहिते
बार्शी,जिल्हा सोलापूर
=============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे