Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट चौदा🎗🎗🎗*

*🌤️विषय : आपण दोघे🌤️*
*🔹गुरूवार : १० / ०४/२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १६५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आपण दोघे*

बाकड्यावर बसून
आपण दोघे बोलूया
सुखदुःख हे वाटून
मनमोकळे हसू या.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

*स्वार्थी जगाला दूर सारुन*
*आपण दोघे निवांत बसुया*
*एकमेकांच्या सुखदुःखाची*
*आपापसात वाटणी करुया*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

आजपावेतो सोसलंय खुप
आता नकोत दारी चार चौघे
परस्परांना समजून घेऊ
सुखदुःखात आपण दोघे

*दिनकर झाडे, गडचांदूर*
*©जि. चंद्रपूर सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

आपण दोघे एकत्रित
आयुष्याच्या संध्याकाळी
प्रत्येक क्षण आनंद देणारा
जगणे आज झाली दिवाळी

*सचिन पाटील*
*(अलिबाग, रायगड)*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

संसार केला सुखाचा
आला काळ म्हातारंपणीचा
जगलो आपण दोघे सुखाने
शेवटी हे दुःख भरले वेदनेने

*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*गो. ए. सो. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

जीवनाच्या सायंकाळी तरी
आपण दोघे असे निवांत
कर्तव्य पार पाडली सर्व
राहिली ना कसली भ्रांत

*बी. आर. पतंगे (beeke)*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

*करूया पार दुःखाची लंका*
*बसून बाकावर आपण दोघे*
*ल्योक कुणाचा सून कुणाची*
*करती ती खोटी खोटी सोंगे*

*श्री.भोसले तानाजी निवृत्तीराव*
*देगलूर जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. ‘अभिजात मराठी २०२५’ विशेषांकासाठी साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आपण दोघे*

बघता बघता दुपार ढळली
आली सांजवेळ आयुष्याची
आपण दोघे सोबत आजही
हीच खरी सुखपुंजी आमुची

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

आपण दोघे जगलो एकदिलाने
फुलविली वंशवेल आनंदाने
आयुष्य कस निसटले हातातून
जपूया एकमेका जूळ्या हृदयातून

*अनिल मेश्राम,सौंदड, जिल्हा- गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

जूडलो संसारात आपण दोघे
नाते निभावले एका दिलाने,
आपल्या सारखेच झाड ही वटले
शीतल छाया देत सातत्याने

*मायादेवी गायकवाड ठोकळ मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

आपण दोघे सुखदुःखाचे साथी
आपणच पाडू कर्तव्य फार
आयुष्याच्या शेवटी सांजवेळी
नाही राहणार कुणावर भार

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

आपण दोघे अंतापर्यंत असू सोबतीला
तर आपल्या जगण्याला येईल अर्थ
नाहीतर सख्या जिवलगा तुझ्याविना
जीवनच माझे होईल रे व्यर्थ

*सौ लता आरेकर इचलकरंजी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

गरिबीवर हसण्यासाठी
जमतील सारे बघे
धैर्याने हातात हात घेऊन
दारिद्रयाला हरवू आपण दोघे

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿
*आपण दोघे*

आपण दोघे एकमेका साथ देऊ
शेवटच्या क्षणापर्यंत बाकड्यावर बसू
सुखदुःखाच्या गुज गोष्टी करू
बागेत बसून मनमानी स्वच्छंदी हसू

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🫧🔸➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे