अभ्यास माझा: मराठी व्याकरण
प्रश्न १ ला :- पाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
१) तत्सम
२) तद्भव✅
३) देशी
४) विदेशी
प्रश्न २ रा :- संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात ?
१) तद्भव
२) देशी
३) तत्सम✅
४) परदेशी
प्रश्न ३ रा :- पुढीलपैकी देशी किंवा देशज शब्द नसलेला पर्याय ओळखा.
१) बोका , रेडा , बाजरी
२) सासू , दूध , ओठ✅
३) पोट , गुडघा , लुगडे
४) झोप , ढेकूण , कंबर
प्रश्न ४ था : – दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा.
१) पुष्प
२) जल
३) कमल
४) धोंडा✅
प्रश्न ५ वा :- गजाली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
१) वऱ्हाडी
२) कोकणी✅
३) नागपुरी
४) अहिराणी
प्रश्न ६ वा :- ताई भावाला ओवाळते यातील ताई हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे ?
१) कानडी✅
२) गुजराती
३) मराठी
४) संस्कृत
प्रश्न ७ वा :- संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द कोणते ?
१) पाय , गाव , कोवळा
२) घर , भाऊ , सासरा
३) कर , भूगोल , परंतु✅
४) झाड , दगड , हाड
प्रश्न ८ वा :- पेपर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?
१) देशी
२) फारशी
३) अरबी
४) इंग्रजी✅
प्रश्न ९ वा :- पुढीलपैकी तद्भव शब्द कोणता ?
१) दगड
२) हाड
३) ढेकूण
४) दूध✅
प्रश्न १० वा :- मंदिर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
१) साधित शब्द
२) सिद्ध शब्द
३) तद्भव शब्द
४) तत्सम शब्द✅
संकलन/सहप्रशासक
अशोक गंगाधर लांडगे
ता. नेवासा जि.अहमदनगर



