गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट तेरा🎗🎗🎗*
*🌤️विषय : फक्त शिकवू द्या हो🌤️*
*🔹गुरूवार : ०८ / ०१ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध २०० साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*फक्त शिकवू द्या हो..!*
अशैक्षणिक कामे व उपक्रमांमुळे
शिक्षक अध्यापनापासून दूर झाले
आम्हाला फक्त शिकवू द्या हो अशी
कळकळीची विनंती ते करू लागले
*सौ. प्रांजली जोशी, विरार पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो*
शिक्षणबाह्य कामांसाठी
नका हो जुंपू शिक्षकांना
त्यांचे काम त्यांना करु द्या
फक्त शिकवू द्या हो मुलांना.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो–*
गुरुंचा अथांग ज्ञानप्रकाश
विदयार्थ्यांच्या पोहोचू द्या मनमनात
फक्त शिकवू द्या हो शिक्षकांना
आवडती फुले प्रसिध्दीस येती जगभरात
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*फक्त शिकवू द्या हो…!*
फक्त शिकवू द्या हो….!
मुलात एकरूप होऊ द्या
मुलांचे कलागुण पाहू द्या
त्यांना शिक्षित होऊन घडू द्या
*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो..!*
पवित्र कार्य ज्ञान दानाचे
अर्त हाक बालकांची हो !
व्यर्थ कामात गुंतूनका गुरुजींना
फक्त शिकवू द्या हो !
*साजेश मगरे*
*तालुका पुर्णा जिल्हा परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो…!!*
फक्त शिकवू द्या हो….!!
आगावू कामे लावू नका
कुत्री मोजणे काम नव्हे
शासनकर्ते हाक ऐका
*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो….!*
आमचे मत ऐका हो
विद्यार्थी आमचे दैवत
फक्त शिकवु द्या हो
अध्यापनात सातत्य
*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो*
फक्त शिकवू द्या हो शिक्षकांना
विद्यार्थ्यांच्या पदरी पडू दे ज्ञानार्जनाचे दान
नका लावू आम्हा अशैक्षणिक काम
देशाचे धडतील सुजान नागरिक छान
*सौ लता आरेकर इचलकरंजी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो*
ऑनलाईन कामाची सजा चिमुकल्यांना
शिकवायला वेळच मिळेना गुरूजनांना
जाईल का हो आर्त हाक सरकार दरबारी
फक्त शिकवू द्या हो..उज्वल भविष्याची तयारी
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो*
फक्त शिकवू द्या हो आम्हाला
अशैक्षणिक कामाचा नको भार
चिमुकल्यांची आर्त हाक…
ऐकेल का शासन दरबार.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो..!!*
*वसा गुरुजीचा हरवत चाल्लाय*
*अशैक्षणिक कामाच्या ओझ्याखाली*
*फक्त आम्हाला शिकवू द्या हो..*
*घडवू भारत अजून बलशाली*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो*
नका करू बेजार दुसऱ्या कामात
फक्त शिकवू द्या राहून वर्गात
काढा त्याची अवांतर कामे ती
सर्वगुण संपन्नता आणील विद्यार्थ्यात
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
*फक्त शिकवू द्या हो*
पाया भक्कम व्हावा विद्यार्थ्यांचा
म्हणूनच फक्त शिकवू द्या हो आम्हांला..
नाहीतर सुशिक्षित पण अशिक्षित पीढी
भविष्यात लाभणार आमचा देशाला…
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️📗🔹📗♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



