0
4
8
2
8
6
असंही घडतं
ओठात एक पोटात एक
शब्दाने मनाला घाव लागतात
सोडून द्यायला शिकेना कुणी
मनाला गैरसमज गोड वाटतात
कधी प्रेमाच्या ठिकाणी राग
कधी रागाच्या ठिकाणी प्रेम..
संकुचित वृत्तीने संशय मनी
मानवी स्वभाव नसतोच सेम
जिथं आठवण तिथं साठवण
जाणिवा जागृत करतात..
हृदयातील गुपित उलगडून
भावना अविरत झुरतात..
जवळ असूनही कळत नाही
इथंच नशीब कुठं तरी घडतं
कठिणातून सोपे काही तरी…
आपल्या प्रश्नांस उत्तर मिळतं
कर्म चांगले ओळख संदेश
शून्यातून विश्व असंही घडतं
दम नि धीर माणसाला ….
पाहिजे त्या उंचीवर नेऊन ठेवतं
सिंधू बनसोडे
इंदापूर जि.पुणे
========
0
4
8
2
8
6



