0
4
0
9
0
3
वाटेवरचे काटे
जीवनाची वाट अशी
काटे,खाच,खळग्यांची
अडचणी येती खुप
चिंता नाही करायची
ध्येय जीवनाचे दृढ
येवो कितीही संकटे
शक्ती आणि विचाराने
दुर करावे ते काटे
येता झंझावात कधी
नाही डगमगायचे
काटे सारून बाजूला
फुले वेचत चालावे
ईर्षा,मोहाने पिडीत
मिळतील किती जण
नको त्यांच्याशी वादंग
दुर्लक्षावे प्रती क्षण
काटे हे वाटेवरचे
दृढ करी अनुभव
वाढे आत्मबल अन्
मार्ग यशदायी भव
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
0
9
0
3





