Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

नववर्ष

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 2 9 0

नववर्ष

तोच सूर्य चंद्र तारे
तेच मोकळे आकाश
तीच निशा तीच उषा
उद्या तोच तो प्रकाश.. //

काय जुने काय नवे
आकड्यांचे खेळ सारे
नववर्ष स्वागताचे
आज वाजती नगारे.. //

काय आले काय गेले
आज थोडे चाळायचे
पुन्हा नव्या उमेदीने
स्वप्नामागे पळायचे.. //

नव्या आशा नव्या दिशा
चालू काही नव्या वाटा
होवू सिद्ध कटिबद्ध
कधी फूल कधी काटा.. //

अनुभव हाच गुरू
नवे आखूया धोरण
सुख समृद्धी यशाचे
दारी बांधूया तोरण

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे