0
4
8
3
0
0
बहुमोलाची गोष्ट
बहुमोलाची गोष्ट सांगतो,
हसण्यावरी नेऊ नको
जीवनात तुला सुख हवे तर,
व्यसन कोणते करू नको ॥धृ॥
तंबाखुला जवळ केला
तोंडाचा मग कॅन्सर झाला
मृत्यूला आमंत्रण देऊ नको…।।१।।
दारूला तू जवळ केले
लिव्हर सारे निकामी झाले
गटारीत तू लोळू नको…॥२॥
‘एडस्’ हा तर महाभयंकर
त्याला जवळी करू नको
मृत्यूला तू कवटाळू नको…।॥३॥
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता.उमरेड जि.नागपूर
0
4
8
3
0
0



