0
4
8
2
9
0
नागपंचमीचा सण
येतो घेऊन श्रावण
नागपंचमीचा सण
चोहीकडे हिरवळ
आनंदात चिंब मन….!!
सख्या जमूनी पूजती
वारुळाच्या नागोबाला
दुध-लाह्या वाहूनिया
मागे वर कुटुंबाला…!!
सडा रांगोळीचा थाट
उपवास भावासाठी
लाभो दीर्घायुष्य देवा
संकटात भाऊ पाठी…!!
कानवले नैवेद्याला
जेवणात गोडधोड
अंगणात उंच झोका
लाभे मैत्रिणींची जोड…!!
झोका खेळून हाताला
फुटायचे किती फोड
बालपण आनंदाचे
आठवणी फार गोड…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
============
0
4
8
2
9
0



