Breaking
अहमदनगरई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

सुखाची चव

डाॅ.नझीर शेख राहाता, जि. अहिल्यानगर

0 4 8 2 9 4

सुखाची चव

कधीतरी नशीबाची नजर
आम्हावरही खिळावी
इतरांप्रमाणेच आम्हालाही
सुखाची चव मिळावी

आतापर्यंत जगत आलोत
अळणी अन् सपक जीवन
खमंग चमचमीत जेवणाप्रमाणेच
आम्हीही सुखाची मेजवानी गिळावी

इतरांच्या जशा होतात
आकांक्षा पूर्ण
आम्हालाही संपन्नतेची
गोडी कळावी

मनी अभिलाषा आहे
ऐहिक सुखांची
आमच्याकडेही समृध्दीची
कृपादृष्टी वळावी

असे ठाण मांडून बसले
हे दारिद्र्य अन् ही गरीबी
पण आता आमची अवस्थाही
वैभवाकडे वळावी

डाॅ.नझीर शेख
राहाता, जि. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे