Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

पुण्यात रथसप्तमी निमित्त सामूहिक सूर्यनमस्कार यज्ञ

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

पुण्यात रथसप्तमी निमित्त सामूहिक सूर्यनमस्कार यज्ञ

सेवा आरोग्य फाऊंडेशनचा उपक्रम

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज ‘वृत्तसेवा’

पुणे.दि. 5 फेब्रु.(प्रतिनिधी) येथील सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेने रथसप्तमी निमित्त सामूहिक सूर्यनमस्कार यज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोथरूड येथील “जीत मैदान”या ठिकाणी सकाळी ८ ते १० या वेळात सादर झालेल्या या कार्यक्रमात विविध सेवा वस्त्यांतील विद्यार्थी, त्यांचे पालक, विविध शाळांचे विद्यार्थी, तसेच स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते महापारेषणचे अधिक्षक अभियंता संदीप हाके. यावेळी सेवा आरोग्य फाऊंडेशनचे संचालक मनोज देशमुख, डॉ. सतीश जोशी, डॉ हर्षदा पाध्ये हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर सामुहिक प्रार्थना झाली.

सेवा वस्तीतील ७४० जणांनी सामुहिक २४,७४० इतक्या संख्येने सूर्यनमस्कार घातले. सर्वांगाला सर्वोत्तम व्यायाम देणारा आणि मन व शरीर सुदृढ राखणारा सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार आरोग्य पूर्ण जीवनशैलीचे प्रतिक आहे. विशेषतः मकर संक्रमणानंतर सूर्याचे उत्तरायण सुरू असताना ही योगरूपी सामुहिक सूर्यपूजा वातावरणात शक्ती व ऊर्जा निर्माण करणारी ठरली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ नारायण देसाई, संस्थापक सदस्य कार्यकारी संचालक, सोसायटी फॉर इकोलॉजिकल रिस्टोरेशन – इंडिया, यांनी सूर्य नमस्काराचे तंत्र सांगून त्याचे जीवनातील महत्त्व विशद केले. यावेळी उपस्थितांनी नियमित सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला.

उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या सहभागींना प्रातिनिधिक स्वरूपात पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व मुला मुलींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रास्ताविकात डॉ सतीश जोशी यांनी सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या विविध आरोग्य प्रकल्प आणि संस्कार प्रकल्पांची माहिती दिली. प्रीती पाटकर यांनी आभार मानले. समृध्दी वर्ग प्रकल्प समन्वयक निरंजनी शिरसाठ यांनी सेवा आरोग्य टीमच्या सहाय्याने कार्यक्रमाचे नियोजन केले. फाऊंडेशनचे यशवंत ववले, दत्ताजी वाळवेकर, दिलीप लिमये, विवेक बाकरे, प्रीती पाटकर, वैशाली चव्हाण, गिरीश गांधी, गणेश जोशी, माधव पाठक यांनी कार्यक्रम संयोजनात योगदान दिले. कार्यक्रमाला संस्थेचे कर्मचारी, कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक, विविध शाळांचे शिक्षक आवर्जुन उपस्थित होते. प्रीती पाटकर यांनी आभार मानले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता  झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे