
0
4
0
9
0
3
चिनुचा शाळेचा पहिला दिवस
आईला झाली कामाची लगबग
तिला जायचे होते ड्युटीवर
सुंदर रांगोळी टाकली भरभर
रूचकर स्वयंपाक केला पटपट
चिनुला न्याचे होते …. कुठे ?
आज शाळेचा पहिला दिवस
दिली आंघोळ घालून चिनुला
आई म्हणाली पोहचवून देते तुला
शाळेचे पटांगण काय ते बघत
प्रवेश होताच पुष्पगुच्छ देऊनी
शिक्षिका करी पालकाचे स्वागत
वर्गाच्या दाराला आंब्याचे तोरण
बघा तिकडे पहिलीची मुले रडत
आईच्या कुशीत येऊन ती दडत
शिक्षिका मुलांच्या मागे धावत
काय ती सर्व इकडे तिकडे पळत
चिनूला दिले बाईनी चाॅकलेट
रडणे दूर खुदू हसली गालात
आईला केले बाॅय बाॅय हसत
बोलली तुला घ्याला येईल परत
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
=========
0
4
0
9
0
3





