Breaking
आरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्रमुंबई

कॅनन (इंडिया) फोटोग्राफी कार्यशाळा

तुषार थळे, अलिबाग

0 4 8 2 9 4

कॅनन (इंडिया) फोटोग्राफी कार्यशाळा

तुषार थळे, अलिबाग

रायगड: जिल्ह्यातील छायाचित्रकारांना नवीन, अद्ययावत तंत्रज्ञान अवगत व्हावे व छायाचित्रकार एका उंचीवर नेण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशन आणि कॅनॉन कपंनीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिनाचे औचीत्य साधून अलिबाग येथील वेव्हज हॉटेलच्या सभागृहात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने या कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन केले होते. लॉग मध्ये व्हिडीओ शूटिंग आणि फोटोग्राफी कशी करावी व नंतर त्याचे एडिटिंग कसे करावे या संदर्भात कॅनॉन चे अधिकृत ट्रेनर सचिन कांबळे यांनी या कार्यशाळेत साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

कॅनॉन कॅमेरा कपंनीचे मॅनेजर किशोर चिंदरकर, रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सल्लागार सुरेश खडपे, सचिन म्हात्रे, सचिन असराणी, वैभव वाणी, विजय पाटील, संतोष पाटील, सचिन शिंगरुत, गणेश जाधव, निशिल सासवनेकर, दिपेश पाटील, गणेश पाटील, कुणाल थळे, महेश मुसळे उपस्थित होते. उपस्थित छायाचित्रकारांसाठी जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते.

या जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धेत अलिबाग येथील अमर मढवी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, पेण येथील सुरज करंगुले द्वितीय, सुदेश माळी तृतीय तर सचिन आसराणी याने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले.
कॅनॉन कॅमेरा कपंनीचे मॅनेजर किशोर चिंदरकर, कॅनॉनचे अधिकृत ट्रेनर सचिन कांबळे आणि रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार संदीप वाटवे यांनी या छायाचित्र स्पर्धेचे परीक्षण केले.

स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून 23 छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. ‘हळदी समारंभातील क्षण ‘ हा विषय या स्पर्धेसाठी देण्यात आला होता. विजेत्या छायाचित्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रशांत गुरव, राकेश मोरे, निखिल भोईर, निलेश दुदम, कॅनॉन चे पियुष श्रीवस्तव, चेतन चौधरी यांनी मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे