
0
6
3
2
2
4
इवलीसी कळी
इवलीसी कळी
गालातच हसते
चिंगी तिच्याकडे
खिडकीतून बघते
इवलीसी कळी
वाऱ्यावर डोलते
वेलीच्या कुशीत
गाढ झोपी जाते
डोळे तिचे
इवले इवले
पाहात असते
करून किलकिले
कमालच करते
इवलीसी कळी
रोज उमलते
एकेक पाकळी
एक दिवस
गंमतच झाली
इवलीसी कळी
फुल होऊन गेली
भुमेश्वरी सातपुते- खोंडे
ता. उमरेड जि. नागपूर
==========
0
6
3
2
2
4



