0
4
8
2
8
4
ऐकिवात नाही
ऐकिवात नाही कधी….
घोड्याला शिंग असतात
पण आम्हाला फुटली हो
कॉलेजात जाता जाता…
ऐकिवात नाही कधी…..
बाई माणसे हवेत उडतात
पण आम्ही भरारा उडतो हो
जेव्हा मित्र मैत्रिणी भेटतात
ऐकिवात नाही कधी….
दिवसा तारे चमकतात
पण आम्हाला दिसतात हो
जेव्हा कामाचे डोंगर उभे असतात
ऐकिवात नाही कधी….
अशाही कविता तयार होतात
पण कवीचे रागरंग असे बदलतात
कुठलाही राग कवितेत आळवतात
वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
==========
0
4
8
2
8
4



