जे. एस. एम. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

जे. एस. एम. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग : (दि 24/09/2026), “नशा मुक्त युवक फॉर विकसित भारत” या अभियानांतर्गत “मेरा स्वास्थ्य, मेरा गर्व – माझे आरोग्य, माझा अभिमान” या संकल्पनेखाली जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देणे तसेच निरोगी व व्यसनमुक्त युवक घडविणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. या शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकारी श्री. अमित सोनवणे, श्री. गणेश सुतार आणि श्रीमती कल्पना गाडे यांनी विद्यार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले आणि डॉ. पंकज घरत उपस्थित होते.
कार्यक्रमाला शुभेच्छा देताना जनता शिक्षण मंडळ, अलिबागचे अध्यक्ष Adv. डॉ. गौतम पाटील यांनी युवकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत व्यसनांपासून दूर राहून निरोगी समाज आणि विकसित भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.
या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले आणि डॉ. पंकज घरत यांनी केले.
“निरोगी युवा – व्यसनमुक्त युवा – विकसित भारत” या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारीबाबत सकारात्मक जाणीव निर्माण करण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.



