Breaking
कवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

नवचैतन्य

संग्राम कुमठेकर ता.अहमदपूर जि.लातूर

0 4 8 2 8 6

नवचैतन्य

डोळ्यापुढं नुसता अंधार
हरपली होती भूक तहान
नराधमांची ती अमानुषता
पेटवित होती नेत्री अंगार

शक्ती एकवटून रे केला
अब्रू वाचविण्या प्रतिकार
पिसाळलेल्या कुत्र्यागत
लचके तोडत झाले स्वार

ढेकर तृप्तीचा देत हैवान
उजळ माथ्यानं झाली दूर
तिरीप पडता किरणांची
धडधडू का लागला ऊर ?

नवचैतन्य पेरून कवडसा
दुःखावर हळुच फुंकर मारी
स्त्रीशक्तीचा होताच हल्ला
प्राणाचे भीक मागती सारी

पेटवा मशाल स्त्रीशक्तीची
लिंगपिसाटांना करण्या सरळ
नांगीच ठेचा त्या लंपटांची
स्त्रीत्वावर जे ओकतील गरळ

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे