कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडाविदर्भसाहित्यगंध
भास आनंदाचा; वृंदा करमरकर
0
4
8
2
9
3
भास आनंदाचा
चादर भवती अंधाराची
ध्यास मनास प्रकाशाचा
दु:खाचे काटे खुपताना
सुख देई भास आनंदाचा
क्षितीज रेषा खुणावते
भासची सत्य भासतो
पुढे पुढे चालण्याची
ऊर्जा नित मनास देतो
रखरखत्या वाळवंटी
मृगजळ ही भुलवितसे
शोध त्याचा घेता घेता
सुखस्वप्नची लोभवितसे
नैराश्याच्या तमात जेंव्हा
शोक दाटून येतो ऊरी
भास आनंदाचा वर्षतो
अंगांगावर सुखाच्या सरी
जीवन हा असे आभास
जाण असते ही मनास
आव्हानांना भिडण्यासाठी
पुरे हा आनंदाचा भास
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली
0
4
8
2
9
3



